डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेला विवस्त्र करून छळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - डाकीण
नंदुरबार - डाकीण असल्याच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत मोठी टिकेची झोड उठत आहे. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्याता वर्तवली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे समितीचे सरचिटणीस विनायक सावळे यांनी जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पीडित महिला कोण याबाबत पोलीसही तपास करत आहेत. मात्र, राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे अनिसने स्पष्ट केले आहे. नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातूनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आणि यातील संबंधीत कोण याचा छडा लागल्यानंतरचे सर्व चित्र स्पष्ट होईल.
Last Updated : Apr 17, 2022, 8:36 PM IST