जनता कर्फ्यू : गोंदियात वृत्तपत्र विक्रेत्याकडून सुरुवात.... - corona crisis
देशासह महाराष्ट्रातही कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आज देशभर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले असून, लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी पहाटे पेपरचे वाटप केले. त्यांनी ७ वाजेपर्यंत सर्व लोकांना पेपर पोहोचवून आपले काम पूर्ण केले.