Akshay Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयाच्या पूर्वसंध्येला चांदीच्या भावात मोठी घसरण
जळगाव - अक्षय्य तृतीयाच्या पूर्वसंध्येला चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी सोमवारी जळगावच्या सराफाच्या बाजारात पहावयास मिळाली. युक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर चांदीचा भाव 70 प्रति 10 किलोवर होता. मात्र, हा दर आज 65 हजारावर आल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात चांदीच्या दरात जवळपास 5 हजारांनी घसरण झाली. अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने-चादी खरेदी करणे शुभ मानले जाते. आणि यंदा सोन्या चांदीचे दर स्वस्त झाल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोने पे सुहागा अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात चांदीची मागणी वाढली असतानाही चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. यामुळे आज अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच दागिन्यांच्या दुकानात मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.