VIDEO : सायखेडा- चांदोरी पुलावर गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतजमीन, वीटभट्टी पाण्याखाली - Chandori bridge
सायखेडा ( नाशिक ) - गेल्या 4 दिवसापासून संततदार पाऊस ( Heavy Rain ) चालू असल्यामुळे गोदावरी नदीच्या ( Godavari river flood ) पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी पुलावरील ( Chandori bridge )गोदावरी नदीत पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात पानवेली देखील वाहून येत आहेत. या पानवेलीच्या अडथळ्यामुळे हे पाणी आजूबाजूच्या शेतजमिनी तसेच वीट भटयात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पानवेली बाजूला कराव्या, अशी मागणी स्थानिक शेतकरी ( Farmers ) तसेच वीट भट्टी मालक करत आहेत.