गांधी@१५० : 'ईटीव्ही भारत'च्या विशेष भजनाची मान्यवरांकडून प्रशंसा... - ईटीव्ही भारत
हैदराबाद - संपूर्ण देशात उत्साहात आज गांधी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून ईटीव्ही भारतनं 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन आवृत्तीच रामोजी राव यांनी लोकार्पण केले आहे. या भजनाच्या माध्यमातून ईटीव्ही भारतने भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भजनाची प्रशंसा केली आहे. यासेबतच केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही हे भजन समाज माध्यमावर शेअर केले आहे...