VIDEO : उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या हस्ते गडचिरोलीच्या जवानांचा सत्कार - अजित पवारांच्या हस्ते गडचिरोली जवानांचा सत्कार
गडचिरोली - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात दाखल (Ajit Pawar Dilip Walse Patil in Gadchiroli) झाले. त्यांनी शहीद पोलीस स्मृती स्तंभावर आदरांजली वाहिली. याच ठिकाणी असलेल्या शहीद पोलीस स्मृती गॅलरीला भेट देत त्यांनी माहिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli Police) मर्दिनटोला येथे 13 नोव्हेंबर 2021 रोजी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत यशस्वी पोलीस पथकाचा सन्मान सोहळा पोलीस मुख्यालयात पार पडला. याच चकमकीत 4 राज्यांचा नक्षल प्रमुख असलेला मिलिंद तेलतुंबडे मारला गेला होता. सन्मान सोहळ्यात कौतुक करताना प्रत्येक पथक जवानाची अजित पवार यांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या शौर्य-पराक्रमाची पवार यांनी प्रशंसा केली. C60 नक्षल विरोधी पथक जवानांच्या कमांडो भत्त्यात वाढ करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.