पौडी येथील जंगलात पेटला वणवा, वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत आग - जंगलात पेटला वणवा
डेहराडून (उत्तराखंड) - पौडी येथील जंगलात वणवा पेटला असून आग वाढत आहे. श्रीनगरच्या जंगलात लागलेला वणवा वाढत असून ही आग लोकवस्तीच्या दिशेने वाढत चालल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दिशेनेही आग वाढत आहे. दूसरीकडे नयालगडमध्येही वणव्याचा तांडव सुरू आहे. जंगलात पेटलेल्या या वणव्यात 3 हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. रेंजर प्रमोद रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नाली जंगलामध्ये 6 वनकर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नयालगड या ठिकाणी 8 कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.