Nashik Leopard : वाडगावमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश - बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - नाशिक तालुक्यातील गिरणारे जवळच्या वाडगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. २० एप्रिल बुधवारी रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या अंधारात विहिरीत पडला. विहीर मालकाने बिबट्याला विहिरीत पडलेला पाहताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. विहिरीत पाणी असल्याने जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड सुरू होती. त्यानंतर तत्काळ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला विहरीतून बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. विहिरीत पाणी अधिक असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला मोठी कसरत करावी लागली. स्थानिकांच्या मदतीने पिंजरा लावून बिबट्या सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.