Video: वनविभागाने घडवली बछडा, मादी बिबट्याची भेट पाहा..पहा व्हिडिओ - forest department Satara
सातारा : किल्ले सज्जनगडावरील रामघळ परिसरात आढळलेल्या बछड्याची मादी बिबट्याशी वनविभागाने अखेर भेट घडवून (forest department made a meeting) आणली. सातारा वनाधिकाऱ्यांना स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल (forest department Satara) झाले. त्यांनी बछड्याला एका डालग्यात ठेऊन ट्रॅप कॅमेरा लावला. रात्री साडे नऊच्या सुमारास मादी बिबट्या आपल्या बछड्याला अलगद उचलून घेऊन गेली. ही संपूर्ण घटना ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली (meeting between the calf and female leopard) आहे.