NSUI Protest: गुवाहाटीत टीएमसी पाठोपाठ एनएसयुआयचेही निदर्शने;पहा व्हिडीओ - NSUI also protested against Shinde
गुवाहाटी: तृणमूल काँग्रेसने गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर गुरुवारी निदर्शने केल्यानंतर गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर एनएसयूआयने पण निदर्शने केले. एनएसयूआयचे राज्य उपाध्यक्ष रक्तीम दत्ता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आणि विविध सरकारविरोधी घोषणाबाजी केली. एनएसयूआयच्या आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन हाॅटेलवर मोर्चा काढला. ( NSUI also staged protests) परंतु पोलिसांनी त्यांना बॅरिकेट लावुन रोखले. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून बसमधून नेले. दत्ता यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप आमदारांची खरेदी-विक्री करत असल्याची टीका त्यांनी केली.