कोल्हापूर : पंचगंगेच्या महापुरात उद्धवस्त झालेल्या चिखली गावाचे भयान वास्तव - पंचगंगेचा महापूर
अनेक जनावरं छतावर बांधली आहेत. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून गावात लाईट नाही. आता गावांत पोहोचताच एक भयाण शांतता पाहायला मिळते. गावात येणाऱ्या प्रत्येक बोटीकडे गावातील लोक घोळका करून खायला काय घेऊन आला आहे का? असे जेंव्हा विचारतात तेंव्हा अक्षरशः कोणत्याही व्यक्तीला हुंदका आवरता येणार नाही, अशीच काहीशी भयानक परिस्थिती या गावांमध्ये पाहायला मिळते.