महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Villagers Looted Fish In Purnea: रस्त्यांवर माशांचा खच! मासे पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड - पूर्णिया येथे ग्रामस्थांनी मासे पळवले

By

Published : Jul 13, 2022, 5:14 PM IST

बिहार - पूर्णिया कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत गढबनेली हायस्कूलजवळ माशांनी भरलेली पिकअप व्हॅन पलटली. पिकअप व्हॅन पलटी होताच सर्व मासे रस्त्यावर विखुरले गेले. यानंतर मासे नेण्यासाठी स्थानिक महिला व पुरुषांची झुंबड उडाली ( Villagers looted fish in Purnea ). नागरिक पोत्यात भरून मासे घेऊन जात होते. लोकांनी सुमारे ४ क्विंटल मासे पळवले ( People loot 4 quintal fish ). तर चालकाने अररिया येथून मासे घेऊन पूर्णियाला जात असल्याचे सांगितले. चालकाला अचानक झोप आल्याने पिकअप वाहन दुभाजकाला धडकले आणि पलटले. त्यावेळी गाडीत सुमारे 6 क्विंटल मासे होते. ज्यामध्ये केवळ 2 क्विंटल मासे हाती आले. लोकांनी 4 क्विंटल मासे पळवले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ( Drivers Negligence ) मासे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details