महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nalasopara Bike Rikshaw Fire : नालासोपार्‍यात भर रस्त्यात अग्नितांडव.. बाईक, रिक्षाने घेतला पेट, 4 जण होरपळले - नालासोपाऱ्यात दुचाकी रिक्षा पेटली

By

Published : Apr 12, 2022, 8:11 PM IST

नालासोपारा - नालासोपार्‍यात आज संध्याकाळी एका विचित्र घटनेत दुचाकी आणि रिक्षाने पेट ( Nalasopara Bike Rikshaw Fire ) घेतला. या घटनेत 4 जण जखमी ( 4 Injured In Bike Fire ) झाले. मंगळवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. नालासोपारा पश्चिमेच्या सिविक सेंटरसमोर एका दुचाकीला अचानक आग लागली होती.. त्यामुळे चालक रस्त्यातच असलेल्या टॅकरमधील पाण्याने आपली दुचाकी धूत होता. यावेळी त्याला काही जणांनी दुचाकीची पेट्रोलची टाकी उघडून त्यात पाणी टाकायचा सल्ला दिला. मात्र, चालकाने टाकी उघडकून आत मध्ये पाणी टाकायचा प्रयत्न केला असता दुचाकीतल्या पेट्रोलचा मोठा भडगा उडाला व दुचाकीच्या मागे असलेली रिक्षादेखील आगीच्या ज्वाळात सापडली. या भयानक अपघाताची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या आगीत रिक्षा आणि दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. रिक्षाचालकासह प्रवासी तसेच बाईकस्वार या आगीत जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी आग कशी लागली त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details