Surat Police: चित्रपट स्टाईलने सुरत पोलिसांची कारवाई; व्हिडीओ व्हायरल
सूरत (गुजरात) - सुरत शहरातून बाहेर आलेले दृश्य पाहून लोकांना वाटते की, बॉलीवूडचा चित्रपट सुरू आहे. ही घटना बारडोली दास्तान गेटजवळ घडली. सुरत क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी टोळीतील सदस्यांना इको कारमधून पळून जाण्यापूर्वी पकडले. बारडोलीच्या दास्तान गेटजवळ सुरत गुन्हे शाखेचे सुमारे 10 ते 15 पोलीस काळ्या रंगाची इको कार लाठ्याकाठ्या घेऊन अडवण्याचा प्रयत्न करत होते. गुन्हे शाखेचे 10 ते 15 पोलीस पोलीस वाहनातून टोळीतील सदस्यांचा पाठलाग करत होते. चिखलीगर टोळीतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत वाहन थांबवायचे नव्हते. चिकलीगर टोळीच्या गाडीजवळ येताच पोलिसांनी या टोळीची गाडी कशीतरी अडवली आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीवर चारही बाजूंनी लाठीहल्ला केला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.