महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2022, 8:10 PM IST

ETV Bharat / videos

Weightlifter Sanket Sargar : संकेतने रौप्यपदक पटकावून आमच्या कष्टाला न्याय दिला - संकेतच्या वडिलांची प्रतिक्रिया

सांगली: सांगलीतील चहावाल्याच्या मुलाने बर्मिंगहॅम ( इंग्लड ) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ) आहे. संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते ( Sanket Sargar father tea seller )आहे. शहरातील संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे.सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. ते मुलाच्या या यशाबद्धल प्रतिक्रिया देताना म्हणाले, संकेतने रौप्यपदक पटकावून आमच्या कष्टाला न्याय दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details