VIDEO : वेळेवर तोडणी न झाल्याने शेतकऱ्याने लावली दीड एकर क्षेत्रातील ऊसाला आग - परतूर आंबा शेतकरी ऊसाला लावली आग
जालना - जिल्ह्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखान्याचे सभासद असूनही ऊसतोड न झाल्याने मेटाकुटीला आलेल्या संतप्त शेतकऱ्याने अक्षरश दीड एकर ऊसाला आग लावल्याची घटना परतूर तालुक्यातील आंबा गावात घडली आहे. मोहन ओंकार मुजमुले असे या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी आंबा गावातील आपल्या शेतात दीड एकर शेतावर उसाची लागवड केली होती. माँ बागेश्वरी साखर कारखान्याचे त्यांचा ऊसाची तोडणी 5 मेपर्यंत करण्याचे स्लिपही दिले. मात्र ऊसतोड टोळी न पाठवल्याने मुजमुले यांनी वैतागून उसाच्या पिकाला आग लावली. शिवाय या सर्व नुकसानाला कारखान्याचे चेअरमन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.