Ganapati Mahaprasad In Nagpur : भलीमोठी कढई.. नागपूरात बाप्पासाठी तयार केला २५०० किलोचा महाप्रसाद - 2500 Kgs Mahaprasad in a bowl
नागपूर - नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर Famous Chef Vishnu Manohar यांनी आज बाप्पासाठी एकाचं वेळी,एकाच कढईत तब्बल २५०० किलोचा महाप्रसाद तयार केला Bappa Mahaprasad in Nagpur आहे. सातळलेल्या डाळींपासून हा महाप्रसाद तयार करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता त्यांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी सुरुवात केली, त्यानंतर तब्बल तीन तासांनी महाप्रसाद तयार झाला. या महाप्रसादाचे नागरिकांमध्ये वितरण Distribution of Mahaprasad to citizens in Nagpur करण्यात आले आहे. गणपती बाप्पाचा उत्सव म्हंटलं तर घरोघरी आरत्यांचे सूर, चौका-चौकात ढोलताश्यांचा जल्लोष प्रत्येक ओंजळीत बाप्पाचा प्रसाद हेच चविष्ट महाप्रसाद वेगळ्या पद्धतीने तयार करण्याचा मानस प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी देखील प्रसाद तयार होत असताना उपस्थित लावली,त्यांनी प्रसाद तयार करण्यात हातभार लावला. सहाशे किलो चना डाळ भिजवल्यांनंतर त्याचं वजन साधारणपणे १८०० किलो झालं आहे,याशिवाय शंभर किलो कढी पाण, दीडशे किलो जिन्नस,खोबरे,आणि इतर साहित्य वापरून हा खिरापत प्रसाद तयार करण्यात आला असून सुमारे 5 हजार लोकांना याचे वाटप केले जाणार आहे. famous chef Vishnu Manohar made 2500 Kgs Mahaprasad in a bowl for Bappa in Nagpur
Last Updated : Sep 7, 2022, 6:00 PM IST