VIDEO : लोकांनी निष्काळजीपणाने वागू नये; डॉ. ए.एम देशमुखांचा सल्ला.. - ईटीव्ही भारत स्पेशल मुलाखत
उस्मानाबाद : सहव्याधी असणाऱ्या लोकांनी निष्काळजी दाखवल्यास धोका वाढतो. सध्या देशात बधितांची संख्या वाढत आहे मृतांची नाही. यापुढे भारतात ज्या लोकांना सहव्याधी आहे आणि त्यांनी जर निष्काळजीपणा दाखवला तर अशा लोकांना कोरोनाची भीती असणार आहे. त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून अशा लोकांनी दोन डोसनंतर 9 महिने कालावधी झाली असेल तर त्यांनी बूस्टर डोस घ्यावा आणि आपल्याला कोरोना होणार नाही, अशा निष्काळजीपणाने वागू नये, अशा सूचना डॉ देशमुख यांनी दिल्या. पुढील पाच वर्ष कोरोनापासून वाचण्यासाठी घ्यावी लागणार लस कोरोनाचा विषाणू हा चीनच्या चुकीमुळे प्रयोगशाळेतून बाहेर पडला आहे. तशे पुरावे देखील समोर आले आहेत. मात्र याबाबत WHO स्पष्टपणे सांगत नाही. चीनमध्ये आरटीपीसीआरचा प्रमाण जास्त आहे.