माजी मंत्री रेणुका चौधरी यांनी धरली पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर - Renuka Chowdhury news
हैदराबाद - तेलंगणातील काँग्रेसच्या माजी मंत्री रेणुका चौधरी यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर धरली. राहुल गांधींना ईडीने समन्स बजावल्याबद्दल हैदराबादमध्ये पक्षाच्या निषेधादरम्यान ही घटना घडली. इतर पोलीस कर्मचार्यांनी त्यांना उचलून नेले. चौधरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि रेणुका चौधरी यांच्यात जोरदार वादावादी झाली. काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या चलो राजभवन कार्यक्रमाला हिंसक वळण लागले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या मध्यभागी एक स्कूटर जाळली आणि TSRTC बसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी टीपीसीसी अध्यक्ष रेवंत रेड्डी, सीएलपी नेता मल्लू भाटी विक्रमार्का आणि इतरांना अटक केली.