Environmentalists aggressive against car sheds कार शेड विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक - खासदार वंदना चव्हाण
मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम कांजूरमार्ग येथील कारशेडचा निर्णय रद्द करून कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे पर्यावरण प्रेमी संघटना आक्रमक झाल्या Environmentalists aggressive against car sheds आहेत. मागील अडीच महिन्यापासून प्रत्येक रविवारी शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात आरे जंगलात आंदोलन करण्यात येत आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरला आहे. राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, निर्मला सावंत प्रभावळकर व इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे.