VIDEO : चाक निखळल्याने मुंबई-हैदराबाद एअर अॅम्ब्युलन्सचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग - major accident averted
मुंबई - नागपूरवरुन हैदरबादला निघालेल्या एका चार्टर विमानाचं (एअर अॅम्ब्युलन्स) पुढचं चाक रनवेवरच निखळून पडलं. नागपूरहून हैदराबाद येथे जाणारे हे एक नॉन शेडयुल विमान होते. गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने तात्काळ हे विमान मुंबईच्या दिशेने वळविण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अगदी सुखरुप उतरविण्यात आले. या एअर ॲम्बुलन्समध्ये क्रूचे दोन मेंबर्स, रुग्ण आणि डॉक्टर सुरक्षित असल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
Last Updated : May 7, 2021, 12:29 AM IST