महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Lawyer Asim Sarode Reaction on Shinde Group : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड बेकायदेशीर व असंवैधानिक आहे : कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे

By

Published : Jul 4, 2022, 9:13 PM IST

सध्या राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि कायदेशीर प्रक्रिया यावर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने कायदेतज्ञ आसीम सरोदे यांच्याशी बातचीत केलीय पाहूया ते काय म्हणाले, राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर ( After the dramatic transition ) खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे यांची यावर चर्चा रंगली असताना विधानमंडळ सचिवांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का दिला आहे. तसे पत्र त्यांनी एकनाथ शिंदे व भरत गोगावले यांना दिले आहे. यावर कायदेतज्ञ असिम सरोदे ( Lawyer Asim Sarode ) यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते ज्या पद्धतीने वागणूक करीत आहेत. ती वागणूक शिवसेना विरोधी आहे. निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असलेला शिवसेना पक्ष हा महत्त्वाचा आहे. विधिमंडळ पक्ष जो असतो त्याला काहीही मान्यता नसते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena party chief Uddhav Thackeray ) यांनी ठरल्याप्रमणे जे गटनेते आहेत, त्यांचेच अस्तित्व हे गृहित धरले जाणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर एकच पर्याय आहे की, एखाद्या पक्षात आपल्या गटाला विलीनीकरण करणे. ते जे सध्यापर्यंत करीत आहे की मीच शिवसेना तर हे कायद्याच्या दृष्टीने टीकणारे नाही. आज काल विशेष अधिकाराचा गैरवापर करण्याचा प्रकार वाढला असून, काल जे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाली आहे, ती त्याचाच एक भाग असल्याचे सरोदे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details