Sanjay Raut : संजय राऊतांना अटक नाही, ईडीने फक्त समन्स बजावले; वकिलांची माहिती - संजय राऊत ईडी समन्स मराठी बातमी
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांच्या घरी सकाळी 7 वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. गेल्या नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरु होती. अखेर आता ईडीने संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. दरम्यान, आता संजय राऊत यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊतांना अटक करण्यात आली नाही. फक्त ईडीने त्यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती वकील विक्रांत साबणे यांनी दिली आहे.