Dussehra 2022 या ठिकाणी श्री महालक्ष्मी देवीला परिधान केली जाते सोन्याची साडी पाहा व्हिडिओ - Shree Mahalakshmi in Sarasbagh Pune
पुणे पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर Shree Mahalakshmi Temple Sarasbagh प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली Gold saree to Shree Mahalakshmi Devi जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्यात आली. सारसबाग येथील श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट श्री महालक्ष्मी Shree Mahalakshmi Devi मंदिरातर्फे वर्षातून दोनदा साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी तृप्ती अग्रवाल भरत अग्रवाल प्रवीण चोरबेले हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली Dussehra 2022 जाते.