Video : जत्रेत चिखल उडाल्याने मुलींमध्ये जोरदार हाणामाऱ्या.. लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना दिला चोप.. पहा व्हिडीओ - Fierce Fight at Disneyland Fair
पलामू (झारखंड ) : पलामूच्या डिस्नेलँड फेअरमध्ये चिखलावरून दोन मुलींमध्ये हाणामारी ( Fierce Fight at Disneyland Fair ) झाली. वाद इतका वाढला की त्या रस्त्यावरच एकमेकांशी भांडू लागल्या. या हायव्होल्टेज ड्रामामध्ये मुलींच्या मैत्रिणीही सामील झाल्या आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक जत्रेला भेट देण्यासाठी गेलेल्या एका मुलीने तेथून जाणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या शेजारून उडी मारल्याने चिखल उडाला. यानंतर दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यानंतर दोन्ही मुलींच्या मैत्रिणींनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बॉयफ्रेडवरून भांडण झाल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर चिखलावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बाजूने भांडण करणाऱ्या मुलीचा शोध लागला आहे. हा गोंधळ पाहता डिस्नेलँड फेअरमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ( GIRLS FIGHT TOGETHER IN DISNEYLAND )