Droupadi Murmu Family Reaction : 'तिने लहानपणापासून खूप संघर्ष केला, ती प्रत्येकासाठी प्रेरणा'; मुर्मू यांच्या भावांनी केल्या भावनाव्यक्त - देशाच्या नव्या राष्ट्रपती
मयूरभंज (ओडिशा) - द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी एनडीएच्या उमेदवारीवर राष्ट्रपती निवडणुकीत यशवंत सिन्हा याना मात देत विजयी मिळवला. त्या आता भारताच्या 15 व्या राष्ट्रपती होणार आहेत. द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवडून येणे ही प्रत्येकासाठी प्रेरणा आहे, असे त्यांचे भाऊ तारिनसेन तुडू यांनी गुरुवारी राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालावर आनंद व्यक्त करताना सांगितले आहे. तर माझी बहीण, एक आदिवासी महिला, अध्यक्षपदी निवडून आल्याने मला खूप आनंद झाला आहे. तिने लहानपणापासून खूप संघर्ष केला आहे. ही प्रत्येकासाठी प्रेरणा आहे,' नवनिर्वाचित अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांचे भाऊ तारिनसेन तुडू यांनी ETV BHARAT ला सांगितले.