पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी विशेष बातचीत
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या राज्यासाठी दिलासादायक ठरत आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना नियंत्रणात येण्यामागे 'कोरोना टास्क फोर्स'च्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना टास्क फोर्स'चे चेअरमन डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचीत केली आहे. पोकळ घोषणा नाही, खोटी आश्वासने नाही, भंपक दावे नाहीत, एवढेच काय तर आरोप-प्रत्यारोपही नाहीत. फक्त काम आणि मानव सेवेचे सर्वोतोपरी प्रयत्न. ईटीव्ही भारतची ही मुलाखत तुम्हाला या सगळ्याचा अनुभव देईलच, हे निश्चित.
Last Updated : Nov 3, 2020, 5:35 PM IST