Pune : पाळीव श्वानाने लिफ्टमध्ये महिलेचा घेतला चावा; मालकिनी विरोधात गुन्हा दाखल - पुण्यात पाळीव श्वानाने घेतला महिलेला चावा
पुणे - घरामध्ये श्वान पाळण्याचे प्रमाण सध्या देखील वाढले आहे. त्यामुळे आपल्या आजू बाजूच्या नागरिकांना याचा धोका असला तरी श्वान पाळणाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नसतो. त्यामुळे शहरात सध्या अनेक ठिकाणी श्वानांवरुन वादावादी होताना दिसत आहे. असाच एक प्रकार पुण्यातील मगरपट्टा रोडवरील सोसायटीत घडला आहे. लिफ्टमधून श्वानाला नेत असताना एका श्वानाने महिलेचा चावा घेतला. त्यात महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी हडपसरमधील सोसायटीतील एका ४४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनिषा सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सोसायटीच्या लिफ्टमध्ये घडला होता.