Ashadhi wari 2022 : देहूतील 'हा' युवक गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण पालखी मार्गावर काढतोय रांगोळी
देहू (पिंपरी) - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पालखी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्याला दाखल झाले आहेत. या पालखी मार्गात देहू येथील ज्ञानेश्वर जाधव हा युवक गेल्या 10 वर्षाहून अधिक काळापासून पालखीसाठी रांगोळी काढत आहे. यंदाच्या वर्षी देखील त्याने त्याच्या या उपक्रमाची सुरवात केली आहे.