Heavy Rain In Nashik : नांदूरमधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 80 हजार क्यूसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यात पावसाची ( Heavy Rain In Nashik ) जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे दारणा, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात ( Discharge of water from Palakhed dam ) आला आहे. निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव गावात नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 80 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.