महाराष्ट्र

maharashtra

Hanuman Chalisa : 'हनुमान मंदिर राजकारणाचा आखाडा नाही, तर भक्तांचे श्रद्धास्थान'

By

Published : May 28, 2022, 1:13 PM IST

नागपूर - शहरातील रामनगर परिसरातील हनुमान मंदिरात आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमान पक्षातर्फे हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा हनुमान चालीसा पठण आणि सुंदर कांड पठाण करण्यात येणार आहे. एकाच वेळी दोन पक्ष हनुमान मंदिरात एकत्र येणार असल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर हनुमान मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे राजकीय पक्ष हनुमानाच्या नावाने राजकारण करत असल्याने भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हनुमान मंदिर हे राजकारणाचे स्थान नसून ते भक्तांचे श्राद्धास्थान आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजण्यासाठी हनुमानाचा वापर करू नये, अशी मागणी हनुमान भक्तांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details