VIDEO : 'संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी.. सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही' - संजय राऊत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलींच्या आरोपांबाबत आज उच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.