Devendra Fadnavis Sagar Bungalow : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेमकं काय शिजतंय ? - devendra fadnavis sagar bungalow Meeting
मुंबई - राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Sagar Bungalow ) यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर सकाळपासून भाजपच्या अनेक नेत्यांची रेलचेल सुरू आहे. यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काही वेळापूर्वी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचे पुत्र नितेश राणे व सोबतच आमदार रवी राणा दाखल झाले. नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या पत्रकार परिषदे आधीच नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याने अनेक चर्चा सुरू झाले आहेत. आता राणे फडणवीस यांच्या भेटीत नेमके काय ठरते याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच या भेटीनंतर राणे पत्रकार परिषद घेणार का? ते नेमके काय बोलणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच सकाळपासून जे काही भाजप नेते देवेंद्र फडणीस यांच्या सागर बंगल्यावर आहेत. यांच्यात नेमके काय बोलणे झाले? त्यांच्यात नेमकी कशा संदर्भात बैठक होते? या बैठकीच्या देखील अपडेट अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या साखर बंगल्यावर नेमके काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष आहे. ( devendra fadnavis sagar bungalow Meeting )
Last Updated : Jun 22, 2022, 10:26 PM IST