Uddhav Thackeray Interview : शिवसैनिकांकडून त्यांना शिवसेना संपवायची - उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray Interview
मुंबई - बदनामी करून मी त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्याकडे जाऊन शिवसेना ( Shiv Sena ) त्यांच्या दाराशी बांधू का? तुम्ही जाऊ शकता पण, तुम्ही जे आज केले ते आधी का नाही केले असा सवाल उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना विचारला आहे. ठरल्या प्रमाणे जर तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असता तर, आम्ही अडीच वर्षानंतर पायउतार झालो असेतो, असे तसे पत्र मी द्याला तयार होतो असा खुलासा ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीसांबद्दल ( Devendra Fadnavis ) बोलतांना ते म्हणाले की, ते एकनिष्ट आहेत. त्यांना शिंदे यांना मुख्यमंत्री केलेले पटले नाही, तरीदेखील ते पक्षासोबत एकनिष्ट आहेत. शिवसैनिकांकडून त्यांना शिवसैना संपवायची आहे असा देखील आरोप ठाकरे यांनी केला. जे गेले आता ते शिवसैनिक राहीले नाही, असे ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले.