नवनीत राणांना तुरुंगात आयोग्य वागणूक, महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलं - देवेंद्र फडणवीस - Navneet Rana jail Mumbai
मुंबई - राज्यात गेल्या चार दिवसांत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. खासदार नवनीत राणा ( Devendra Fadnavis on Navneet Rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी खासदार नवनीत राणा ( Devendra Fadnavis on Navneet Rana jail Mumbai ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली आणि नंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि पोलिसांवर टीका केली. राणा यांना तरुंगात हीन वागणूक मिळाल्याची माहिती भाजप नेते फडणवीस यांनी दिली. नवनीत राणांवर ( Navneet Rana jail Mumbai ) आयोग्य वागणूक झाली असून, आता लोकशाहीबद्दल बोलणारे कुठे आहेत? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच, या प्रकारानंतर महाराष्ट्राचे पुरोगामित्व संपले, असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे देखील ते म्हणाले.
Last Updated : Apr 25, 2022, 3:01 PM IST