Deoghar Ropeway Accident Video: देवघर येथे रेस्क्यू करताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना खाली पडून एकाचा मृत्यू
देवघर (झारखंड) ( Jharkhand Deoghar Incident ) - त्रिकुट रोपवेमध्ये ( Trikut Ropeway ) काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोपवे हे हवेतच अडकले ( Deoghar Jharkhand Ropeway Accident ) आहे. मागील 20 तासांपासून देवघर त्रिकुट रोपवेमध्ये 48 पर्यटक अडकले होते. 42 प्रवाश्यांना काढण्यात प्रशासनाला यश आले. 11 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता हवाई दलाच्या गरुड कमांडोंच्या पथकाने MI-17 आणि MI-17 V5 हेलिकॉप्टरच्या मदतीने 32 जणांची सुटका केली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास एक दु:खद घटनाही घडली. बचावकार्य करत असताना एका पर्यटकाला हेलिकॉप्टरवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा सेफ्टी बेल्ट उघडला आणि तो खाली खड्ड्यात पडला. 10 एप्रिलच्या संध्याकाळपासून सर्वजण अडकून पडले आहेत.