धक्कादायक.. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पॅक करण्यासाठी नातेवाईकाकडे 800 रुपयांची मागणी - वाशिममध्ये कोरोना रुग्णसंख्या
वाशिममधील कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पॅक करण्यासाठी नातेवाईकाकडे 800 रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील उमरा येथील मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकाला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 800 रुपयांची मागणी केली व त्यानंतरच मृतदेह पॅक करू असे सांगितले.