मोहम्मद जुबेरला सीतापूर न्यायालयात हजर; न्यायालयाकडून कारागृहात रवानगी - हिंदू संतों पर विवादित टिप्पणी
सीतापुर - धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी (Alt) न्यूजचे संस्थापक मोहम्मद जुबेरला सीतापूर न्यायालयात हजर केले. 2 जून रोजी सीतापूरमधील खैराबाद पोलीस ठाण्यात हिंदू संतांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आयपीसीच्या (कलम 295A)आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत त्याच्या विरोधात (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याला स्थानिक न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद जुबेरच्या कोठडीची मागणी केली आहे. न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.