महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Deep Amavasya : दीप अमावस्या विशेष! जाणून घ्या, दीप अमावस्येचे महत्त्व... - Mahant Aniket Shastri Deshpande

By

Published : Jul 28, 2022, 10:21 AM IST

नाशिक - आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. हिंदू संस्कृतीमध्ये ( Hindu culture ) दिव्याला अत्यंत पवित्र स्थान आणि खूप महत्त्व आहे. दिवा म्हणजे अंधकार दूर करणारी वस्तू, साक्षात नारायण देवता असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे आपल्या सर्व मनुष्य जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश अच्छादित व्हावा म्हणून दिव्याची पूजा हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये तसेच प्रत्येक पूजेमध्ये सांगितलेली आहे. आजच्या दिवशी दिव्याची पूजा करावी आणि घरातील पितरांच्या नावाने तर्पण करावे. तसेच कडूलिंब, पिंपळ, तूळस, आवळा, आदी वृक्षांची लागवड ( tree Plantation )करावी, म्हणजे त्यांना अक्षय मोक्ष सूख प्राप्त होते. त्याचबरोबर माशांना खाद्य द्यावे. त्याचबरोबर दीप अमावस्येच्या दिवशी शिव, पार्वती आणि कार्तिकीय यांची विधिवत पूजा करावी, अन्नदान किंवा आर्थिक दान करावे ( Donate food or money ). आपल्या घरातील जे आपत्य आहेत मुलगा आणि मुलगी यांचे औक्षण करावे. ज्याने त्यांच्या ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये प्रकाश पडावा आणि आयुष्य वृद्धिंगत व्हावे अशा पद्धतीने दीप अमावस्या ( Deep Amavasya ) सर्वांनी साजरी करावी. असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे ( Mahant Aniket Shastri Deshpande ) यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details