VIDEO : तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईसह उपनगरांना तडाखा.. मुसळधार पावसासह जोरदार वारे - तौक्ते चक्रीवादळ
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम मुंबईसह उपनगरात जाणवू लागला आहे. घोंघावणाऱ्या वाऱ्यासह रात्रीपासूनच मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. मुंबईकरांची तारांबळ उडाली असून ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबईकरांच्या मनात धडकी भरवली आहे.