जामा मशिदीबाहेर जमावाची घोषणाबाजी! भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी - Jama Masjid
दिल्ली - दिल्लीतील जामा मशिदीबाहेर आज शुक्रवार (10 जुन)रोजी नमाजानंतर भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, हजारो लोक जामा मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते. येथून नमाज अदा केल्यानंतर काही लोक बाहेर आले, तेव्हा त्यांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे.