VIDEO : पावसामुळे लोकल बंद असल्याने सीएसएमटी स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी - मुंबई पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात पहिल्याच पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावरीवल लोकल सेवा कोलमडली आहे. सीएसएमटी-ठाणे, गोरेगाव-सीएसटी आणि वाशी-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक सकाळीपासून बंद करण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात सीएसएमटी रेल्वे स्थानकांबाहेर गर्दी उसळली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी नितीन बिनेकर यांनी घेतलेला हा आढावा.