VIDEO : जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा उगम चीनमधूनच.. पुण्यातील संशोधकांची जागतिक पातळीवर दखल - कोरोनाचा उगम चायनामधूनच
डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर यांनी विविध संशोधन प्रबंध आणि जैवमाहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाचा सर्वात जवळचा नातेवाईक आरएटीजी ( RaTG ) १३ हा विषाणू कुठून आला असावा, हे शोधण्यात यश मिळवलेले आहे आणि तसे वृत्त सर्वप्रथम ईटीव्हीने सप्टेंबर 2020 साली दिले होते. आत्ता या दोन्ही संशोधकांनी केलेल्या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेतली असून जगातील विविध शास्त्रज्ञ आत्ता एकत्र येत याबाबत संशोधन करत आहे.