रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद; बाजारपेठ, रस्ते ओस
रत्नागिरी - राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. यावर आळा घालण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं बंद करण्यात आले आहेत. एरवी गजबजलेली बाजारपेठ, रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. त्यातच लॉकडाऊनचा मोडून जे विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांच्यावर केली जात आहे. रत्नागिरी शहरात आठ ठिकाणी बॅरिकेटिंग करून पोलिस येणाऱ्या प्रत्येक वाहनांवर नजर ठेवून आहेत. तर चिपळूणमध्येदेखील लॉकडाऊनला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. चिपळूण शहरातही रस्ते आज मात्र निमनुष्य झालेले पहायला मिळत आहेत. दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
Last Updated : Apr 10, 2021, 7:22 PM IST