Supreme Court Hearing : सुनावणी पुढे ढकलायला नको होती - आसीम सरोदे - सुनावणी पुढे ढकलायला नको होती
पुणे - राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष मोठ्या खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवला जाण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर आज (बुधवारी) सुनावणी पार पडली. यावर घटना अभ्यासक आसीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनावणी पुढे ढकलायला नको होती. आज प्राथमिक स्वरूपात सुनावणी झाली पण जी सुनावणी आज झाली त्यात असे वाटत आहे, की आज एकनाथ शिंदे यांचा गट हाच शिवसेना आहे. हे आज सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया आसीम सरोदे यांनी दिली आहे.