MLA Prithviraj Chavan फुटबॉल संघाला दिलेल्या धकमीबाबत चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी - Maharashtra Assembly Session
मुंबई सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्यावर भारतविरुद्धच काम केले असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. प्रफुल्ल पटेल Praful Patel यांनी जागतिक फुटबॉलची शिखर संघटना फिफा आणि आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन AFC कडून भारतावर बंदी घालण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने Coa बुधवारी अवमान याचिका दाखल केली. यावर बोलताना केंद्रीय क्रिडा मंत्रालयाचं भारतीय फुटबॉल संघांवर नियंत्रण कमी पडले आहे. त्यामुळे यात जे दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण Senior Congress leader Prithviraj Chavan यांनी केली आहे.