Video : काँग्रेस नेते आशिष देशमुखांचा समृद्धी महामार्गावर दोनशे किलोमीटर प्रतितास वेगाने केला प्रवास, म्हणाले - nagpur latest news
नागपूर - नागपूर-मुंबई या दोन महानगरांना जोडणारा बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचे औपचारिक उद्घाटन अजून होणे बाकी आहे. मात्र काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावर दोनशे किलोमीटर प्रतितास वेगाने कार चालवली ( Ashish Deshmukh traveled on Samruddhi Highway ) आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ देखील तयार केला असून तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आशिष देशमुख यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर गाडी चालवून वैदर्भीय जनतेला आणि शेतकऱ्यांना या महामार्गाचा स्वतःच्या विकासासाठी उपयोग करावा असा सल्ला दिला आहे. विदर्भातील उत्पादन मुंबईच्या बाजारापर्यंत नेण्यासाठी पुरेपूर वापर करण्याचे आवाहन आशिष देशमुख यांनी केले आहे. त्यांनी समृद्धी महामार्गावर ताशी 175 ते 200 किलोमीटर वेगाने गाडी चालवून हा महामार्ग किती उत्कृष्ट आहे. हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला आहे. २ मे रोजी महामार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत असताना महाविकास आघाडी सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने या महामार्गावर गाडी चालवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.