Sharad Ponkshe Controversy : शरद पोंक्षेंच्या विधानावरुन काँग्रेस आक्रमक; दिला 'हा' इशारा - ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे राहुल गांधी
पुणे - सावरकर आणि काँग्रेस हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. काल ( रविवारी ) पुण्यात एका कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे ( Actor Sharad Ponkshe ) यांनी सावरकरांची दहशत असली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. तसेच लहान मुलांना सावरकर कळतात, पण राहुल गांधींना ( Rahul Gandhi ) कळत नाही, असा प्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला होता. यालाच प्रतिउत्तर देताना सावरकरांची दहशत म्हणजे लोकप्रियता मिळवण्यासाठी का? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. देशभरामध्ये काँग्रेसकडून या गोष्टीचा निषेध करण्यात येत आहे. पुण्यातही काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. शरद पोंक्षे स्वतःच्या मुलींना बाहेर देशात शिकायला पाठवतात. इतर बहुजनांच्या पोरांना सांगतात की सावरकरांची दहशत पाहिजे. ते एक नाट्य कलावंत आहेत. पैसे घेऊन नाटक करणाऱ्यांनी आपल्या मर्यादामध्ये राहून काम करावे. या प्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.