महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Uddhav Thackeray : 'हातामध्ये काम नसेल तर, नुसते राम राम करुन...'; 'अग्निपथ'वरुन उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल - उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष वर्धापनदिन मराठी बातमी

By

Published : Jun 19, 2022, 3:43 PM IST

मुंबई - शिवसेनेचा आज 56 वा वर्धापनदिन. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अग्निपथ योजनेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला ( cm uddhav thackeray on agneepath scheme ) आहे. अग्निपथ विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. का भडकली त्यांची माथी? कोणी भडकवली त्यांची माथी? म्हणून मी आपल्यासभेत बोललो होतो हृदयात राम आणि हाताला काम हवं. आज हेच चित्रं देशात दिसतंय. हृदयात राम आहेच. पण, प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम म्हणून काही उपयोग नाही. चार वर्षासाठी सरकार नोकरी देणार आहे. नंतर नोकरीचा पत्ता नाही. ऐन उमेदवारीच्या वयात शिक्षण नाही. मृगजळ दाखवलं जात आहे. लाखोंनी मुलं आली तर नेमकी किती मुलं कामाला येणार? सर्वात भयानक प्रकार म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? असं असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणू. टेंडर काढा, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला ( cm uddhav thackeray criticized modi government ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details