महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : मणिकर्ण खोऱ्यातील तोश नाल्यात ढग फुटले; मुसळधार पावसामुळे तीर्थन डोंगरात विध्वंसाचे दृश्य - cloud burst in tosh nala kullu

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Aug 1, 2022, 10:34 PM IST

कुल्लू (हिमाचल प्रदेश) : कुल्लू जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बियास नदीला पूर आला आहे. असे असतानाच सायंकाळी मणिकर्ण खोऱ्यातील तोश नाल्यात ढग फुटले. सायंकाळच्या सुमारास नाल्यात ढग फुटल्याने एक कल्व्हर्टही त्याच्या कचाट्यात आला ( cloud burst in tosh nala kullu ) आणि नाल्यालगतच्या ग्रामस्थांची जमीनही पाण्याखाली गेली. त्याचबरोबर कल्व्हर्ट वाहून गेल्याने आता पर्यटकांची वाहनेही अडकून पडली आहेत. स्थानिक लोकांनीही याबाबत कुल्लू प्रशासनाला कळवले आहे. सध्या ढगफुटीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचबरोबर आता सोमवारी महसूल विभागाचे पथकही गावाला भेट देणार असून ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचाही आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय रविवारी कुल्लू जिल्ह्यातील बंजार येथील तीर्थन खोऱ्यातही दरड कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे तीर्थन डोंगरात विध्वंसाचे दृश्य दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details